भारत

नवज्योतसिंग सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 May :- पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना 34 वर्षे जुन्या रोडरेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धूंच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक हजार रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका केली होती. सिद्धू यांना आता एकतर अटक होईल किंवा त्यांना आत्मसमर्पण करावे लागणार आहे. पंजाब पोलिसांना याप्रकरणी कायद्याचे पालन करावे लागणार आहे.

शिक्षा भोगण्यासाठी सिद्धूला पटियाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. सिद्धू काही वेळापूर्वीच पटियालाहून अमृतसरला रवाना झाले आहे. मात्र, त्यांनी या निर्णयाबाबत केवळ ‘नो कमेंट्स’ म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योत सिद्धू यांना आज पटियाला तुरुंगात नेले जाऊ शकते. सिद्धू हे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अकालीचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांचे शेजारी असतील.