मराठवाडा

धक्कादायक! मैत्रिणीवर बलात्कार करत बनवला व्हिडिओ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 May :- वाळूज शहरातील एका कॉलेजमध्ये जाऊन मित्राला नोट्स हव्या आहेत, असे सांगून मित्राने मैत्रिणीला कारमध्ये बसवून तिच्यावर कारमध्येच बलात्कार केला व त्याच्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्ये बनवला. पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या अक्षय दिलीप साठे (26, रा. नेवासा, जि. अहमदनगर) याच्यासह अन्य तिघांवर पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात 15 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

20 वर्षीय पीडिता आई-वडिलांसह वाळूज परिसरात राहते. कोरोनाकाळात पीडितेचे कुटुंबीय मूळ गावी गेले होते. यादरम्यान, पीडितेचा मित्र अक्षय संपर्कात आला. पुढे त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. दोघेही सोशल मीडियावर मेसेज करून एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. लॉकडाऊन शिथिल झाल्याने पीडितेच्या वडिलांनी पुन्हा वाळूज गाठून कंपनीत काम सुरू केले.

यादरम्यान, औरंगाबादेतील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पीडितेला अक्षयने फोन करून माझ्या मित्राला नोट्स हव्या आहेत, असे सांगून भेटण्याची वेळ ठरवली. त्यानुसार अक्षय नेवासा येथून एका मित्राला सोबत घेऊन कारने 25 जुलै 2021 रोजी औरंगाबादला आला. त्याने पीडितेला कारमधून घरी सोडतो, असे सांगून तिला कारमध्ये बसवले. वाळूजच्या दिशेने जाणारी कार अचानक अक्षयने तिसगाव फाट्याच्या दिशेने वळवली. कार निर्जनस्थळी जात असल्याचे पाहून पीडिताने चौकशी केली असता, कार उभी करून अक्षय पीडितेशेजारी येऊन बसला. त्यानंतर तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करू दे, अशी मागणी केली. त्यावर पीडिताने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अक्षयने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला.

या वेळी अक्षयच्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्ये बनवला. या व्हिडिओच्या माध्यमातून पीडितेची बदनामी करण्याची धमकी देत अक्षयने तिच्यावर वारंवार औरंगाबादेतील लॉज व इतर ठिकाणी बलात्कार केला. तसेच, पीडितेच्या होणाऱ्या पतीस व्हिडिओ दाखवून तिचे लग्न मोडले. यासाठी अक्षयचे वडील व भावाने त्याची मदत केल्याने राहुल साठे, वडील दिलीप साठे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.