15 वर्षीय मुलाची आत्महत्या
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 May :- आज च्या पिढीतील मुलाना राग खूप लवकर येण्याचे प्रमाण खूप वाढले आहेत. काही मनाविरुद्ध घडले कि टोकाचे पाऊल उचलतात वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याचा राग आल्याने वरद प्रीतम भालके वय १५ या शाळकरी मुलाने सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सिन्नर येथे शनिवारी दि.१४ रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. नुकताच दहावीत गेलेल्या या विद्यार्थ्यांने राग अनावर झाल्याने हे कृत्य केल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
देवी रोड परिसरातील राम नगरीत वास्तव्यास असलेले अमित सुरेश गजेकर वय ४३ यांचा भाचा वरद प्रीतम भालके वय १५ याच्या मित्राचा शनिवारी शहरातील एका हॉटेलात वाढदिवस होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जाण्याची त्याने तयारी केली. मात्र रात्री अपरात्री घराबाहेर फिरणे अयोग्य असल्याने घरच्यांनी वरदला वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाण्यास विरोध केला. त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊन बसला. कुटुंबातील इतर सदस्य टीव्ही पाहत होते.
बराच वेळ टीव्ही पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मागील खोलीचा दरवाजा बंद असल्याचे पाहिले. बराच वेळ होऊनही वरद बाहेर आला नसल्याने कुटुंबातील लोकांनी या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी गेले. मात्र, ही खोली आतून बंद होती.दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद देत नसल्याने हा दरवाजा तोडण्यात आला. या वेळी वरदने सीलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता त्याचा मृतदेह पंख्याला आढळून आला. त्याला तातडीने खाली उतरवत शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.