फडणवीसांनी दिले उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 May :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई वेगळी करण्याचा मुद्दा असो की हिंदुत्व आणि बाबरी प्रकरणी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना या सभेतून प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई वेगळी करायची आहे पण महाराष्ट्रापासून नव्हे तर तुमच्या भ्रष्टाचारापासून असे फडणवीसांनी म्हटले आहे. यावेळी मुंबईत लंकादहन होणारच, मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वाघाचे फोटो काढले म्हणजे वाघ होता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले.
यशवंत जाधवांची संपत्ती 35 हून 53 कोटींवर कशी गेली असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित करत मुंबई मनपात भ्रष्टाचार केला असा आरोप केला आहे. संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर डोक टेकवणे हा गुन्हा नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अयोध्येत त्यांचा एकही नेता नव्हता असा टोला त्यांनी पुन्हा लगावला आहे.
बाबराी पाडली याचा गर्व आहे. मात्र तिथे एकही शिवसैनिक नव्हता असा टोला पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माझ्यावर मुख्यमंत्र्यांचा खुप विश्वास आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझे वजन 128 किलो होते असे म्हणत माझे राजकीय वजन तुम्ही कमी करू शकत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
केवळ वाघांचे फोटो काढून वाघ होता येत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गेली 2 वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते. असे म्हणत वाघ हा भोळा असतो, आणि बाळासाहेब तसे होते. मात्र धूर्त कोल्हा कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका केली आहे. देशात केवळ एकच वाघ आहे, असे सांगताना त्यांनी मोदीं हेच वाघ असल्याचे म्हटले आहे.
घंटा बडवणारे नाही अतिरेक्यांना ठोकणारे हिंदुत्व भाजपचे आहे. म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये जात एअर स्ट्राईक केला. हिंदुत्वावरून फडणवीसांची ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी देशात खरा हिंदू केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. असे म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई वेगळी करायचीच आहेच, मात्र ती केवळ यांच्या भ्रष्टाचारापासून दूर करायची आहे. ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कुणामध्ये नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मुद्दे नसले की मुंबई तोडण्याचा मुद्दा घ्यायचा हे शिवसेनेचे राजकारण सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ठाकरे परिवार मुंबईचा बाप कसा झाला? असा सवाल त्यांनी केला आहे.
शिवसेनेने 5 वर्षे आमच्यासोबत संसार केला आणि संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत पळून गेले आणि दुसऱ्यासोबत संसार थाटला आहे. असे त्यांनी म्हटले आहे. आता लंकेचे दहन होणार असा मला ठाम विश्वास आहे. 2014 पूर्वी सामनात जे छापून येत होते ते खरे होते का हे शिवसेनेने सांगावे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विकासावर मुख्यमंत्र्यांचे एकही भाषण नाही म्हणत औरंगाबादचे नामांतर करण्यासाठी भाजप सत्तेत येण्याची वाट पाहावी लागेल असे म्हणत त्यांनी औरंगाबदच्या नामांतराचा मुद्दा भाजप मनपासाठी पुढे करणार असल्याचे जाहीरच केले आहे.
गेली अनेक वर्षे मुंबई मनपामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार संपवत आम्हाला मुंबईला तुमच्या भ्रष्टाचारापासून दूर न्यायचे आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची मुंबई मनपावर सत्ता येणार असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांसाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी असे आवाीन त्यांनी आज केले आहे.