उल्कापिंड येतोय पृथ्वीच्या दिशेने; 18000 किमी एवढा प्रचंड वेग
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 May :- अवघ्या ब्रह्मांडातील सजीवसृष्टीचे कथित नेतृत्व करणाऱ्या पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. NASA च्या वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, हा लघुग्रह ताशी 18 हजार किमी एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा आकार अमेरिकेच्या 440 मीटर उंच एम्पायर स्टेट बिल्डिंगहून जास्त मोठा आहे. नासाची सातत्याने त्याच्यावर नजर आहे. हा उल्कापिंड 15 मे रोजी मध्यरात्री म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार 16 मे रोजी पहाटे 2.48 वा. पृथ्वीच्या अगदी जवळून पुढे जाईल.
संशोधकांनी पृथ्वीपासून 74,83,449 लाख किमी अंतरावरुन पुढे जाणाऱ्या उल्कांचा समावेश धोकादायक उल्कापिंडांच्या श्रेणीत केला आहे. त्यामुळे हा लघुग्रहही याच श्रेणीत येतो. ही उल्का सध्या पृथ्वीपासून 5,632,704 किमी अंतरावर आहे. तिला Asteroid 388945 (2008 TZ3)नावाने ओळखले जात आहे.
हा लघुग्रह 490 मीटर रुंद व न्यूयॉर्कच्या 440 मीटर उंच एम्पायर स्टेट बिल्डिंगहून मोठा आहे. त्याचा आकार पृथ्वीवर विध्वंस घडवून आणण्यासाठी पुरेसा आहे. 1908 मध्ये पूर्व सायबेरियात कोसळणाऱ्या एका उल्कापिंडाने 200 मीटरच्या परिघातील सर्वकाही नष्ट केले होते. 100 मीटरहून अधिक रुंद असणारा कोणताही लघुग्रह ज्वालामुखीच्या स्फोटाच्या तुलनेत जवळपास 10 पट जास्त विध्वंस घडवून आणू शकतो.
हा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर मोठा विध्वंस होईल. पण, नासाने तो पृथ्वीला धडकणार नाही तर आपल्या वसुंधरेच्या अगदी जवळून पुढे निघून जाईल असे स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वीवरुन डायनासोरचा झाला तसा मनुष्याचा सफाया होईल काय? या प्रश्नाचे उत्तर नेहमीच कळीचा प्रश्न बनला आहे. अनेक अंतराळ संशोधन संस्था व संशोधक या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अहोरात्र संशोधन करत आहेत. नासाने या प्रकरणी नुकतेच ‘डार्ट मिशन’ लाँच केले आहे.