बीड

खा.सुप्रिया सुळेंनी मानले या तीन नेत्यांचे आभार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 May :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केतकी चितळे या अभेनेत्रीने फेसबूक च्या माध्यमातून खालच्या भाषेत टीका केली होती याच टीकेच्या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेत्री चितळे च्या पोस्टवर प्रत्युत्तर दिले आसल्याने सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या प्रकरणासंदर्भात येथील पत्रकार परिषदेत सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. पवारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे फेसबुकवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या विषयाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना सुप्रिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेची भाषा योग्य नसल्याचं म्हटलं होतं. याच निषेधासाठी सुप्रिया सुळेंनी या तिन्ही नेत्यांचे आभार मानले.

त्यांनी या कृतीच्या (टीकेच्या) विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचं जगातील कुठल्याही समाजात कोणीचं समर्थन करु शकत नाही.” असं ही सुप्रिया सुळे म्हणाल्या.