महाराष्ट्रराजकारण

केतकी चितळेचा18 मे पर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 May :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेचा 18 मे पर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम हलवण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने न्यायालयात पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, ठाणे सत्र न्यायालायने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. तिला शनिवारी अटक करण्यात आली होती.

केतकी चितळेने वकील न घेता स्व:ता युक्तीवाद केल्याची माहिती आहे. ती म्हणाली की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे असे तीने या पोस्टमध्ये लिहिले आहे. पण याच पोस्टमध्ये शरद पवारांबाबत नरकाची भाषा केले गेली आहे. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने यावेळी केला. तसेच मी या पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असेही तिने कोर्टासमोर म्हटले.

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी केतकी विरोधात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या कळंबोली भागात केतकीला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा तिचा ताबा ठाणे पोलिसांनी कळंबोली पोलिसांकडून घेतला होता. त्यानंतर तिला आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

केतकी चितळेने शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केतकि चितळेचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठाणे गुन्हे शाखेचे पथक केतकीला ठाण्यात घेऊन जात असतानाच तिच्यावर शाईफेक देखील करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याबाहेर काही महिलांनी केतकी हाय-हाय अशा घोषणाही दिल्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केतकीला आणि तिच्यासारख्या इतरांना महाराष्ट्र दर्शन घडवील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी दिला.