महाराष्ट्रराजकारण

भाजपचे लोक मनोरुग्ण:मुख्यमंत्र्यांची टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 May :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील सभेत शिवसेनेच्या बीकेसीतील सभेत चौफेर टीका केली आहे. हनुमान चालिसा, भोंग्याचा मुद्दा, बाबरी प्रकरणी सहभाग, महागाई आणि भाजपसोबत युतीत सडलो असे म्हणत त्यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडले आहे. जर दाऊद भाजपमध्ये गेला तर हे लोक त्याला ही मंत्री करतील असा गंभीर टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपचे लोक आज दाऊदच्या मागे लागले आहेत. उद्या दाऊद भाजपमध्ये आला तर हे लोक त्यालाही मंत्री करतील. मी मध्येच म्हणालो की आमचे हिंदुत्व हे गदा वाहणारे आहे, तुमच्यासारखे घंटा वाजवणारे नाही. आमचे हिंदुत्व गाढव आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. होय, आम्ही 3 वर्षांपूर्वी गाढव आमच्यापासून दूर केले. गदा उचलण्यासाठी ताकद लागते, जी फक्त शिवसेनेकडे आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनली मंचावर येताच शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले आहेत. संभाजी महाराजांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी सभेला सुरुवात केली आहे.ज्यांना इतकी वर्ष महाराष्ट्रात राहून तो समजला नाही, तो खोटा हिंदुत्वाचा मुखवटा घालणारा पक्ष देशाची दिशा भरटकवतोय असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे​.

टोपीत हिंदुत्व नसते तर टोपीखालच्या डोक्यात हिंदुत्व असते, भगवी टोपी घालून हिंदुत्व दिसत नसते. भाजपचे लोक मनोरुग्ण आहेत असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जांच्यांवर विश्वास ठेवला त्यांनी केसाने गळा कापला असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून आणि मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरून त्यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. काश्मीरी पंडितांना संरक्षण नाही आणि टिनपाटांना झेड सिक्यॉरिटी देण्यात येत आहे. असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.