बीड

कोरोनाच्या धास्तीने वृद्धाची आत्महत्या

पाटोदा: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या मनात भीती चांगलीच बसली आहे.पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे राहणाऱ्या आसाराम रामकिसन पोटे या ६५ वर्षीय वृद्धाने (दि.४)गुरुवारी सकाळी ६ वजात च्या सुमारास शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली.
सदर घटनेची माहिती शहाजी भानुदास पोटे राहणार मंगेवाडी यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचा तपास डोके पोलीस नाईक हे करत आहेत. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच पो.डोके यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला.आसाराम रामकिसन पोटे यांचा मृतदेह शवविच्छेदना करीत पाठवण्यात आला आहे.या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडलेली आहे आणि चिठ्ठी मध्ये “कोरोनाच्या धास्तीने मी आत्महत्या करत आहे” असा मजकूर लिहलेला आहे.या प्रकरणाने पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात अली आहे.पुढील तपास पो.नि.सिद्धेश्वर माने यांच्या मार्गदर्शना खाली पो.नि. डोके करत आहेत. तरी जनतेने कोरोणाला न घाबरता कोरोचा सामना करावा हा आजार बरा होऊ शकतो असे आव्हान करण्यात आले