महाराष्ट्रक्राईम

पंकज कुमावतांच्या जिल्हाबाहेरील कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात हाहाकार !

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 मे:- सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जात असलेले पंकज कुमावत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक एम. मलिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशा वरून उस्मानाबाद येथे अवैद्य जुगार मटका आणि गुटख्यावर व1 अड्ड्यावर झडप घालून 36 जणांच्या विरुद्ध कार्यवाही करीत 15 लाख 49 हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेत मोठी कार्यवाही केली असल्याने आता पंकज कुमावत यांचा औरंगाबाद विभागात मोठा दरारा निर्माण झाला आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशावरून केज उपविभागचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांचे सोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, दिलीप गित्ते, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अहंकारे, दिगंबर गिरी, शामराव खणपटे, रशीद शेख, मंगेश भोले, रामहरी भंडाणे, संजय टुले, सत्यप्रेम मिसाळ, आरसीपी पथकाचे जवान, वाहन चालक इनामदार व अंगरक्षक भुंबे यांच्या पथकाने उस्मानाबाद शहरातील ठिकाणी अवैद्य धंदे आणि जुगार अड्ड्यावर कार्यवाही केली.जुगार अड्डा या चार ठिकाणी असे एकूण 11 ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाडी टाकल्या यात 6 लाख 70 हजार रु. सह एकूण 15 लाख 49 हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. धाडीत 29 आरोपी ताब्यात घेतले असून 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कार्यवाहिमुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग व पोलीस पथकाचा उस्मानाबाद जिल्ह्यात अवैद्य धंदे करणाऱ्यावर धाक निर्माण झाला आहे.