महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ट्विटवरून धमकी; तरुण अटकेत

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 मे:- महाराष्ट्र राज्यात सध्याच्या काळात कोणाला कधी कोणाची धमकी येईल सांगता येत नाही अगदी तश्याच प्रकारे काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी आली होती. त्यांना धमकी येऊन आठवडा होतो कि नाही तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना ट्विटवरून धमकी आली.ट्विटरवरून तरुणाने दिलेल्या धमकीवर राष्ट्रवादीकडून सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात आली होती. यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली होती. शरद पवारांना धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

राष्ट्रवादी नेते चव्हाण यांनी ट्विट करून म्हटले होते की, नथुराम तयार करण्याची फॅक्टरी कुणाची आहे? याची चौकशी झाली पाहीजे, ही मागणी महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडे केली. तसेच 107, 153 अ, 504, 506 व माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत कायदेशीर कारवाई करुन अशा विकृतांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले होते.

पवारांच्या विरोधात निखिल भामरे या माथेफिरूने धमकी देणारे ट्विट केले होते. “बारामतीच्या गांधीला संपविण्यासाठी बारामतीत नथुराम गोडसे तयार व्हावा”, असे विकृत ट्विट करुन या माथेफिरून थेट हत्या करण्याची भाषा वापरली होती. त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरज चव्हाण यांनी केली होती. याच मागणीची दाखल घेऊन त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.