बीड

ट्रक टँकर चा भीषण अपघात:,पाच जण जागीच ठार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 may:- दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आणि मृत्यूची संख्या वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडना घडली असून या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टँकर्स आणि क्रेनला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे. अपघातात मृत्यू झालेले 4 धुळे जिल्ह्यातील असून 1 जळगाव येथील आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिस दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून 5 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.