राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 May :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सभा गाजवल्यानंतर राज ठाकरे यांना विरोध सुरु आहे. विविध प्रकारे राज ठाकरे यांना विरोध सुरु असताना अश्यातच जीवे मारण्याचे पत्र आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली.
यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपल्यासह आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
पत्र हिंदी भाषेत असून त्यात ऊर्दू शब्द असल्याची माहिती नांदगावर यांनी दिली. राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भोंग्यासंदर्भात घेतलेली भूमिका बंद करावी, नाहीतर जीवे मारण्यात येईल, अशी धमकी पत्रात दिली असल्याचे नांदगावर यांनी सांगितले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बाळा नांदगावकर यांच्या सुमारे 20 मिनीट चर्चा झाली. यानंतर ते शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. तर बाळा नांदगावकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे.