महाराष्ट्र

‘या’ तारखेला तुकोबा, माऊलींची पालखी पंढरीकडे…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 May :- आषाढी वारीच्यानिमित्ताने संत तुकराम महाराज यांची पालखी 20 जुनला, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 21 जूनला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवणार आहे. तिथी वाढ असल्याने पालखीचा इंदापुरात मुक्काम वाढणार आहे. तसेच आंथुर्णे येथेही यंदा पालखी मुक्कामी असेल, अशी माहिती पालखी सोहळा समितीतर्फे देण्यात आली आहे.

गेली 2 वर्षे करोना महामारीच्या बांधनानंतर सर्व संतांचे पालखी सोहळे यावर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. यंदाच्या वर्षी मोकळ्या दिंड्यांची संख्या 200 पेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे. कोरोनामुळे 2 वर्षे वारी झाली नाही, त्यानंतर पहिल्यादा पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. ही संभाव्य गर्दी लक्षांत घेऊन प्रशासनाने नियोजनात फेरबदल केले आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.

यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना पालखी मार्गावर, पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात याव्यात, अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत. सोलापूरात पालखी सोहळ्याचे आगमन 4 व 5 जुलै रोजी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी मार्ग आणि विविध पालखी तळांची पाहणी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.