भारत

मोठी बातमी! वादळी पावसाचा इशारा…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 May :- तीव्र उन्हामुळे बेहाल झालेल्या लोकांना यंदा मान्सूनची एंट्री लवकर होणार आहे अशी बातमी कळल्यानंतर मोठा आनंद झाल्याचे दिसून आले. परंतु आता हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिल्याचे आता नव्याने समोर आले आहे. असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) ओडिशा, बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी केला आहे. आयएमडीने सांगितले की, सोमवारी सकाळपासून हे वादळ तीव्र चक्रीवादळाचे रूप धारण करेल. IMDच्या मते, चक्रीवादळ असनीचा प्रभाव कार निकोबारच्या 610 किमी उत्तर-पश्चिम, पोर्ट ब्लेअरच्या 500 किमी पश्चिम, विशाखापट्टणमच्या 810 किमी आग्नेय आणि पुरीच्या 880 किमी दक्षिण-पूर्वेस सर्वात जास्त दिसेल.

बंगालच्या उपसागरात ज्या वेगाने हे वादळ दाखल झाले त्यावरून 9 मे रोजी बंगाल आणि ओडिशामध्ये 90 किमी/ताशी आणि 10 मे रोजी 125 किमी/ताशी या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याचदरम्यान वादळी पाऊसही पडेल.

ओडिशाचे मदत आयुक्त पीके जेना यांनी सांगितले की, राज्यातील चार बंदरे पारा बेट, गोपालपूर, धामरा आणि पुरी यांना डेंजर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात NDRF आणि ODARF तैनात करण्यात आले आहेत. आम्ही समुद्रातील सर्व मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, असेही ते म्हणाले.