खैरेंची जीभ घसरली, नवनीत राणांना एकेरी उल्लेख करत दिली धमकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 May :- ”खासदार नवनीत राणा काहीही बोलतात, आम्ही शिवसैनिक आहोत, आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते, आम्ही काहीही करू शकतो.” असा धमकी वजा इशारा औरंगाबादेतील शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राणा दाम्पत्यांना दिला आहे. ”आता सहन होत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांना कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही” असा इशाराही खैरे यांनी दिला आहे. बीडमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्या बाई काय होती, कोण होती हे मला सर्व माहित आहे. आधी राष्ट्रवादीने सपोर्ट केला आता भाजप सपोर्ट करत आहे. या बाई म्हणजे पक्ष बदलणाऱ्या बाई असल्याची टीका खैरे यांनी केली आहे. गेली काही दिवस राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांचा वाद सुरू आहे. मातोश्री परिसरात त्यांना हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटले होते.
यानंतर 12 दिवस राणा दाम्पत्याला जेलची हवा ही खावी लागली होती. मात्र यानंतरही शिवसेना आणि राणा यांच्यातील वाद संपताना दिसत नाहीये. आता चंद्रकांत खैरे यांच्या धमकीला राणा काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकांना मिसगाईड करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. भाजपकडून शिवसेनेवर खालच्या स्थरावर टीका केली जात आहे. भाजपची पातळी घसरल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतपणे काम करत आहेत. मात्र हे लोक जिथे तिथे खोडा घालत आहेत, सरकारला काम करू देत नाही असा टोला खैरेंनी लगावला आहे.