महाराष्ट्र

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली – मुख्यमंत्री

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 May :- ”अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांनी-ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली अशी आठवण शिवसेनेविरोधात गुर्र-गुर्र करणाऱ्यांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.शिवसैनिक म्हणजे केवळ कार्यकर्ता नाही तर गुरुशिष्य नाते जपणारा पक्ष आहे.

जगात गुरुशिष्य परंपरा जपणारा शिवसेना एकमेव पक्ष असल्याचेही असेही ते म्हणाले. शिवसैनिक आनंद दिघे यांच्यावर आधारीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती रिलीज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांचा वक्तशिरपणा करारीचा होता, त्यांनी शिवसैनिक घडवले त्यांच्यासारखेच आनंद दिघे यांनीही शिवसैनिक घडवले. त्यांच्यावर चित्रपट काढणे आणि हे कार्य पुढे नेणे कौतुकास्पद असल्याचेही ठाकरे म्हणाले.आनंद दिघे निष्ठेने कार्य करीत राहीले त्यांची निष्ठा काय आहे हे सिनेमाद्वारे कळेल.दिघेंनी अनेकांना जपले असेही ठाकरे म्हणाले.