बीड

कै.गुजर गुरुजींचे समाजकार्य अतुलनीय-डॉ.दिपा क्षीरसागर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 May :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रांत सरचिटणीस आणि प्राथमिक शिक्षक संघाचे मराठवाडा विभाग प्रमुख कै. डी. के. गुजर यांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून ३० वर्ष केलेले समाजकार्य अतुलनीय आणि कौतुकास्पद आहे. डी. के. गुजर हे हाडामासाचे आणि आदर्श शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजीवन केलेला संघर्ष विसरणं शक्य होणार नाही. डी. के. गुजर हे खूप कमी काळ जगले तरी त्यांनी आपलं काम करता करता सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले.

स्व. काकूंपासून त्यांचे संबंध आमच्या परिवाराशी घनिष्ट आणि जिव्हाळ्याचे होते. आज कै. डी. के. गुजर यांच्या जयंतीनिमित्त आजी माजी ४२ सैनिकांचा होत असलेला मानसन्मान कौतुकास्पद आहे कारण सैनिकांचे महत्व आणि योगदान आपल्या देशासाठी किती आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे. खरं तर या सैनिकामुळेच आपण सुरक्षित आहोत त्यांच्यामुळेच आपल्याला सुखाची झोप लागते असे प्रतिपादन डॉ. दीपा क्षीरसागर यांनी आज दि. ७ मे रोजी दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे कै. डी. के. गुजर सर सामाजिक प्रतिष्ठाण, बीड आयोजित गुजर समाजातील आजी माजी भारतीय सैनिकांचा सन्मान सोहळ्यात केले.

आज बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे कै. डी. के. गुजर सर सामाजिक प्रतिष्ठान बीड आयोजित गुजर समाजातील आजी माजी भारतीय सैनिकांचा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा प्राचार्या दिपा क्षीरसागर आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन आजी माजी भारतीय सैनिकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कै. डी. के. गुजर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप्रज्वलन करून करण्यात आली.

आपल्या मनोगतात पुढे बोलताना डॉ. दिपा क्षीरसागर म्हणाल्या की, इथे उपस्थित असलेल्या आजी माजी सैनिकांच्या पत्नींच्या संघर्षाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण तुमच्या त्याग, सहनशीलता आणि संघर्षामुळेच सैनिकास प्रेरणा ऊर्जा मिळते. महिलांना अबला म्हणून चालणार नाही कारण महिलांमध्ये संघर्षा करणाची जिद्द, चिकाटी आणि शक्ती ही प्रचंड प्रमाणात असते. असे डॉ. दिपा क्षीरसागर यांनी वक्तव्य केले. या प्रसंगी माजी आमदार उषा दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, कुंडलिक खांडे, नगरसेवक विनोद मुळूक, विलास विधाते, भैय्यासाहेब मोरे, पोपळे यांच्याबरोबर आदी मान्यवर, सत्कारमूर्ती आजी-माजी सैनिक, आणि मोठया संख्येत गुजर परिवार उपस्थित होता.