महाराष्ट्र

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा कलम लावणे चुकीचे; मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 May :- राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, यावरून मुंबई पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्यावर लावण्यात आलेला राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तब्बल 12 दिवसांच्या कोठडीनंतर बुधवारी उच्च न्यायालायने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दाम्पत्यानी केला होता. तसेच, यादरम्यान मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याला 11 दिवस कोठडीत काढावे लागले. मात्र, याप्रकरणात राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. त्यांच्यावरील राजद्रोहाचे आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे राजद्रोहप्रकरणी राणा दाम्पत्याला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी न्यायालयाने त्यांच्यावर कठोर अटी लादल्या आहेत. तसेच, या अटींचे उल्लंघन केल्यास पुन्हा कारवाई होईल, असेही बजावले आहे.