भारत

मलिकांचा न्यायालयात धक्कादायक खुलासा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 May :- नवाब मलिक यांनी आज न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी सलाईन सुरू असताना जबरदस्तीने डिस्चार्ज करून घेतला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तर पिण्यासाठी पाणी देखील देण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नाही असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. आज मलिकांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू असताना हा प्रकार घडल्याचा खुलासा मलिकांनी केला आहे.

जे जे रुग्णालयात असताना योग्य वागणूक दिली नाही असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केला आहे. मला कोणतीही कल्पना न देता सलाईन काढण्यात आले. तर पिण्यासाठी पाणी मागितले असता त्यातही हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

न्यायालयीन कोठडीत असताना मलिकांची तब्बेत खराब झाली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मलिकांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू असताना हा प्रकार घडल्याचा खुलासा मलिकांनी केला आहे. आता यावर न्यायालयाकडून काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी करताना पीएमएलए कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली होती. खरेतर, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.