महाराष्ट्र

अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 May :- सध्या महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायचा नाही. तसा कुणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक शासन केलं जाईल, अशा शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “आपल्याला सगळ्याच जाती-धर्माच्या धार्मिक स्थळांचा आदर आहे. तिथे गेले तर नतमस्तक होतो. त्यांच्या धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी ते करत असतात. ही आपली परंपरा आहे. त्यामुळे सध्या राज्यात हे जे काही सुरू आहे, ते थांबलं पाहिजे.

ग्रामीण भागात जागरण गोंधळ, हरीनाम साप्ताह याची मला सर्वात जास्त काळजी आहे. कारण असे कार्यक्रम रात्री उशिरा आयोजित केले जातात. गावातील लोक मजुरी काम करून घरी परतल्यानंतर जेवण वगैरे करून अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. पण भोंग्यांना विरोध केल्यामुळे अशा कार्यक्रमांवर देखील बंधणे येणार आहेत,” असं पवार यावेळी म्हणाले.