सुखद बातमी!आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह
बीड -कोरोना रुग्ण वाढीला चांगलाच ब्रेक लागत असल्याचे सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे.बीड जिल्ह्यातून आज सकाळी 45 स्वॅब लातुरच्या प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठवण्यात आली होती.या 45 आहवालांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली.
बीड शहरात शिथिल वेळेत वाढ केलेली असताना आज एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही ही गोष्ट नक्कीच बीड़वासियांना आनंद देणारी आहे.
काळजी घ्या…गर्दी करू नका…स्वस्थ रहा!