अमेरिकेत नागरिक रस्त्यावर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 May :- गर्भपाताच्या घटनात्मक अधिकाराशी संबंधित ५० वर्षे जुना निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवू शकते. याच्याविरोधात अमेरिकेत लागोपाठ दुसऱ्या दिवशी आंदोलने झाली. देशभरात गर्भपात अधिकार समर्थक आणि विरोधक हजारो महिलांनी रॅली काढली. व्हाइट हाऊस आणि अमेरिकन संसद कॅपिटल हिलसमोर निदर्शने करण्यात आली.
न्यूयॉर्कमधील फोली चौकात हजारो लोकांनी या मसुद्याच्या विरोधात घोषणा देत रस्ता जाम केला. लॉस एंजलिसमध्ये आंदोलनकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. अमेरिकेत गर्भपाताचा घटनात्मक अधिकार संपवण्याच्या हालचालींसह या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. बहुतांश देश गर्भपाताला परवानगी देऊ इच्छित नाहीत. जाणून घेऊया जगात गर्भपाताच्या अधिकाराची काय स्थिती आहे.
*अमेरिकेत गदारोळ का? अमेरिकन सुप्रीम कोर्टाने रो विरुद्ध वेड निर्णय फिरवला तरीही अमेरिकेतील सर्व राज्यांत गर्भपात लगेच बेकायदेशीर होणार नाही. गर्भपात कायदेशीर बनवायचा की बेकायदेशीर हे राज्यांना ठरवावे लागेल. अलबामा, जॉर्जिया, इंडियानासह अमेरिकेची २४ राज्ये गर्भपातावर बंदी आणणार आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर ते तातडीने कार्यवाही करतील.
*काय आहे रो विरुद्ध वेड निर्णय? हा निर्णय नॉर्मा मॅककॉर्व्ही नावाच्या एका महिलेच्या याचिकेवरून आला होता. टेक्सासमध्ये गर्भपात कायद्यानुसार असंविधानिक आहे. न्यायालयीन कार्यवाहीत त्यांनाच जेन रो नाव देण्यात आले. जानेवारी १९७३ मध्ये सुप्रीम कोर्टाने मॅककॉर्व्ही यांच्या बाजूने निर्णय देत सांगितले, गर्भपात करून घ्यायचा किंवा नाही हे ठरवणे महिलांचा अधिकार आहे.
*कोणत्या देशांनी गर्भपात कायद्यावर बंदी घातली? १९९४ नंतर केवळ पोलंड, अल सॅल्व्हाडोर आणि निकारागुआनेच गर्भपात कायदा कडक केला. निर्णय फिरवल्यास अमेरिकाही या देशांत समाविष्त होईल.
*किती देशांत गर्भपातावर बंदी? इराकसह १६ देशांत गर्भपातावर पूर्णपणे बंदी आहे. यूएईसह ३९ देशांत आईचा जीव वाचवण्यासाठी गर्भपातास परवानगी आहे.
*गर्भपातास कुठे मान्यता? बमहिलांनी मुलाला जन्म द्यायचा की नाही याचा अधिकार ब्रिटन, जपान, फिनलंडसह १४ देशांतच दिला जातो.
*भारतात गर्भपात कायद्याची काय स्थिती आहे? विधवा किंवा घटस्फोट महिला व दिव्यांग महिलांना २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताचा अधिकार आहे. गर्भामध्ये कोणतीही विकृती किंवा गंभीर आजार असेल, तरीही २४ आठवड्यांत गर्भपाताचा अधिकार आहे.