महाराष्ट्र

राज ठाकरेंना उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 May :- राज्यात भोंग्याचा मुद्दा उकरून काढत राज्य सरकारची मोठी अडचण करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शह देण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मैदानात उतरले आहेत. औरंगाबादेत त्यांची 8 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी त्यांची सभा होणार आहे.

राज यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा होईल अशी माहिती शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून सभेची जय्यत तयारी आतापासूनच सुरु करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीबाबत पोलिसांना पत्र दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसनेची मराठवाड्यात स्थापना झाली तो दिवस 8 जून आहे याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादेत सभा घेणार आहेत. सभेसंबंधी औपचारिक बाबी अजून बाकी असल्या तरी तारीख मात्र निश्चित झाली आहे असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंनी नाहकपणे राज्यात भोंग्याचा मुद्दा तापवला. त्यामुळे राज्यात अशांततेचे वातावरणही निर्माण झाले आहे. याच धर्तीवर राज्य सरकारने पोलिस बंदोबस्तही वाढवला पण राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा राज यांचा हा पावित्रा दिसतो. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी आणि जनतेत राज्य सरकारची छबी उंचावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभेला महत्व प्राप्त झाले आहे.

औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण याच बालेकिल्ल्याला एमआयएमने खिंडार पाडायला सुरुवात केली. त्यानंतर आता राज यांनीही सभा घेत औरंगाबादेतील जनतेला आपल्याकडे आकर्षिक केले आहे. त्या धर्तीवर उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.

शिवसेनेची औरंगाबादेतील पकड ते या सभेद्वार मजबुत करतील. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात शिवसेनेची नेहमी सभा झाली तेथे आता मनसेनेही सभा घेतली आहे, त्यामुळे याच मैदानात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.