गेवराईतील गोदाम किपर संजय राजपुत
गेवराई-तालुक्या मधील ७० लाख रुपायांच्या राशन धान्य घोटाळा प्रकरणी अखेर गेवराईतील गोदाम किपर संजय राजपुत यांना प्रशासनाने आज रोजी निलंबित केले.
अगोदर भाजप कार्यकर्ते अरुण मस्के यांनी धान्य घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गोदाम किपर संजय राजपूत आणि त्यानंतर फिर्यादी असलेला नायब तहसीलदार भंडारे हे दोघे आरोपी झाले आहेत. या प्रकरणात आता गोदाम किपर संजय राजपूत याला निलंबित करण्याचे आदेश आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.