महाराष्ट्र

अन नवनीत राणा ढसाढसा रडू लागल्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 May :- 12 दिवसांपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या राणा दाम्पत्याची आज सुटका झाली. नवनीत राणा यांची रवी राणा यांच्या काही तास आधी सुटका झाली होती पण त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवी राणा कारागृहातून बाहेर येताच लीलावतीत पोहचले. दोघांची 12 दिवसानंतरची ही पहिली भेट ठरली. पतीला पाहून नवनीत राणा भाऊक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

तत्पूर्वी खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर आताच आमदार रवी राणा यांचीही तळोजा कारागृहातून आता सुटका झाली. ते कारागृहातून हनुमान चालिसा म्हणत बाहेर पडले.

गाडीतून ते आता लिलावती रुग्णालयात गेले असून छातीत त्रास जाणवल्याने लिलावती रुग्णालयात भरती असलेल्या त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांची ते भेट घेतली. त्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले आहेत. नवनीत राणा यांची आजच भायखळा कारागृहातून सुटका झाली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.