महाराष्ट्र

नवनीत राणा लिलावती रुग्णालयात दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 May :- मागील 12 दिवसांपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर आताच आमदार रवी राणा यांचीही तळोजा कारागृहातून आता सुटका झाली. ते कारागृहातून हनुमान चालिसा म्हणत बाहेर पडले.

गाडीतून ते आता लिलावती रुग्णालयात गेले असून छातीत त्रास जाणवल्याने लिलावती रुग्णालयात भरती असलेल्या त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांची ते भेट घेतील. नवनीत राणा यांची आजच भायखळा कारागृहातून सुटका झाली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना 23 एप्रिलला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन मंजूर केला होता. पण, कागदोपत्री कारवाई पूर्ण न झाल्यामुळे बुधवारची रात्र त्यांना तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर गुरुवारी सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर नवनीत राणांची सुटका करण्यात आली तर रवी राणांच्या सुटकेबाबतची प्रक्रियाही सुरू आहे.

दरम्यान, तुरुंगातून बाहेर पडताच नवनीत राणांना तुरुंगात पोटदुखी व मानदुखीच्या त्रासामुळे थेट लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापुर्वी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. हनुमान चालिसाचा आग्रह करणाऱ्यांकडून सरकारचा छळ केला जात आहे. केवळ 12 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर नवनीत राणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सरकारची ही दडपशाही सुरू आहे. अशास माफिया सरकारपासून महाराष्ट्राची सुटका व्हायला हवी, असेही सोमय्या म्हणाले.

राणा दाम्पत्याकडून गुरुवारी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे जामीनपत्र बोरिवली न्यायालयात जमा करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांच्या सुटकेचे आदेश घेऊन दोन पथके भायखळा आणि तळोजा कारागृहात पोहोचली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याची सुटका करण्यात आली.

तुरुंग प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर तब्येत बिघडली नसती, राणांच्या वकिलांचा दाव
तुरुंग प्रशासनाने वेळीच नवनीत राणांच्या यांच्या ढासळत्या तब्येतीची दखल घेतली असती तर नवनीत राणांची तब्येत एवढी बिघडली नसती, असे नवनीत राणा यांच्या वकिलांनी म्हटले आहे. तसेच, तुरुंग प्रशासनाच्या डॉक्टरांकडूनही नवनीत राणा यांची तपासणी करण्यात आली होती. या डॉक्टरांनी नवनीत राणांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचनाही केल्या होत्या. मात्र, तुरुंग प्रशासनाकडून याप्रकरणी हलगर्जी करण्यात आली. त्यामुळेच राणांची तब्येत बिघडली, असा आरोपही राणांच्या वकिलांनी केला.