महाराष्ट्र

माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 May :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद पाहायला मिळतो. दोघांवरील वादात आता देवेंद्र फडणवीसांनीही उडी घेत मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला. ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणे सोडत नाही. उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे” असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाउत्सव कार्यक्रमात अमृता फडणवीसांच्या गाण्यांवरून त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यानंतर अमृता फडणवीसांनी ट्विट करत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता. दोघांमधील या शाब्दिक फैरीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांची तुलना करत दोघांमध्ये एका बाबतीत साम्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे. अशाप्रकारचं काही आल्यानंतर माझ्या पत्नीनेही त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही. अशा गोष्टी सोडून द्यायला हव्यात. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यावर मी अधिक बोलणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.