बीड

बीडवासियांनो सावधान! दरड कोसळण्याची शक्यता

बीड: पावसाळा सुरु झाला कि घाटामधील दरड कोसळल्याच्या अनेक घटना आपणास वाचण्यास व ऐकण्यास मिळतात अनेकदा जीवित हानी सुद्धा होते.आपल्या बीड मधील डोळ्यांचे पारणे फिटतील असा निसर्गरम्य सुंदर असणारा मांजरसुंबा घाट.

मांजरसुंबा घाटातून जाणारा नॅशनल हायवे रस्ता डोंगर पोखरून तयार करण्यात आलेला आहे. शंभर फूट उंच असलेल्या डोंगरावरील कडा इथून पुढे होणाऱ्या पावसामुळे कोसळण्याच्या मार्गावर असून या रस्त्यावर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या डोंगराला तात्काळ जाळीरूप सुरक्षा कवच लावायला हव अन्यथा आंदोलन करू.अनर्थ झाला तर आय.आर.बी. याला जबाबदार राहील, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अॅड अजित एम.देशमुख यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच रस्ता बनवण्याकरिता जवळपास शंभर फूट उंचीचा डोंगर पोखरला होता.या डोंगराला कोणताही उत्तर करण्यात आलेला नाही.पहिल्या पावसापूर्वी काही दगड सुद्धा खाली पडले होते. आणि आता इथून पुढे पावसाळा सुरु होत आहे. मांजरसुबा घाटातून सतत नागरिकांची ये जा सुरु असते म्हणून येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना होऊ शकते. या डोंगरातील अनेक कडा, कोसळण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे मांजरसुबा घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.