बंसल क्लासेसच्या स्तुत्य उपक्रमाचे बीडभर कौतुक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 May :- सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेच प्रतीक असणाऱ्या पवित्र रमजान ईद याचबरोबर अक्षय्य तृतीया आणि जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त राजस्थान कोटा पॅटर्न असलेल्या बीड बंसल क्लासेसने सामाजिक बांधिलकी जपत दि. 3 मे रोजी दिवसभर बीड शहरातील बशीरगंज भागात पाणी वाटपाचे मोठे समाजिक कार्य पार पाडले.
तहानलेल्यास पाणी देणे यापेक्षा मोठे पवित्र कार्य दुसरे असूच शकत याच दृष्टिकोनातून बीड बंसल क्लासेसच्या टीमने दिवसभर मोफत जलपान सुविधा दिली. याठिकाणी मोठ्या संख्येत नागरिकांनी बीड बंसल क्लासेसने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत जलपानास प्रतिसाद दिला.
बीड शहरात अल्पवधीच नावारूपाला आलेल्या बंसल क्लासेसने आपल्या अभिनव उपक्रमांनी बीडकरांना सातत्याने प्रभावित केले आहे. सेवाधर्म सर्वोच्च समजत बीड शहरामधील बशीरगंज भागात हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सेवेत मोफत जलपान सुविधा दिली. दिवसभर बंसल क्लासेसच्या टीमने तहानलेल्यास पाणी वाटपाचे पवित्र कार्य केले. या सेवेचा नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला. या जलपान सुविधेच्या उपक्रमाबद्दल शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी कौतुक केले आहे.
बीड शहरात शैक्षणिक क्रांती घडवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन बंसल क्लासेस शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे करतानाचे समाधानकारक चित्र सध्या दिसून येत आहेच पण याबरोबरच सामाजिक मूल्यांची जान ठेवत बंसल क्लासेस हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सेवेत मोफत जलपान सुविधा देऊन सामाजिक उपक्रम राबवत बीडकरांची मने देखील जिंकली आहेत.