महाराष्ट्र

राज ठाकरे आक्रमक! मनसैनिकांना दिले कडक आदेश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 May :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्रभरात हनुमान चालिसा लावावी असे पत्रक काढले आहे. भोग्यांचा त्रास काय असतो त्यांना समजू द्या म्हणत मशिदीसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे काढा अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल असे अल्टिमेटम दिले होते. याचा पुनरोच्चार त्यांनी औरंगाबादेतील सभेतही केला होता.

3 मे ला ईद असल्याने आंदोलन करू नका, मात्र 4 मेला भोंगेबंद केले नाही तर लाऊडस्पीकर लावा असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यानंतर पोलिसांनी राज्यभरातील मनसेच्या जवळपास 15 हजार कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. राज ठाकरे उद्याच्या आंदोलनावर ठाम असून त्यांनी पत्रकातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे. तुम्ही बाळासाहेबांचे ऐकणार आहात की सत्तेवर बसवणाऱ्या शरद पवारांचे असे म्हटले आहे.