फडणवीसांचे 1857 लढ्यातही मोठे योगदान; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
2 May :- बाबरी मशीद आंदोलनात माझाही सहभाग होता, मी तिथेच होतो, तेव्हा शिवसेना कुठे होती? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विचारला होता. त्यावर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्यत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे 1857 च्या लढ्यात खूप मोठे योगदान आहे. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
बाबरी प्रकरणावरील फडणवीसांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे 1857 च्या लढ्यात खूप मोठे योगदान आहे. मात्र आपन त्यात जायला नको, राममंदिर चांगले होते आहे.कोर्टाने चांगला निकाल दिला आहे.
शिवसेनेने त्यावेळी मोठा संघर्ष केला होता. राज्यासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यावर राजकीय नेत्यांनी बोलायला हवे. आम्ही विकासाचे दृष्टीने काम करत आहोत, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. मविआकडून लोकांची चूल पेटवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र विरोधी पक्षाकडून घर पेटवण्याचे काम सुरू आहे, असा टोला यावेळी आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
ठाकरे सरकारकडून मुंबईच्या विकासाचे काम सूरू आहे. अनेक ठिकाणी आपण चांगले फुटपाथ तयार होत आहेत, तर बेस्टचा विकासही आपन पाहता अहात असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने त्यांचे स्वत:चे मुंबईकडे लक्ष असते. मुंबईसाठी चांगले काम करण्याचे काम आम्ही करत आहोत, यासाठी सर्व एजन्सी एकत्र काम करत आहे.
भोंगे काढायला ज्यांना भिती वाटते, ते म्हणतात की आम्ही बाबरी पाडली. मी स्वत: तिथे होतो, मात्र शिवसेनेचे कोणी तिथे नव्हते. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा. आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याण सिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती. यात एकाही शिवसैनिकाचे नाव का नव्हते असस प्रश्न त्यांनी शिवसेनेला विचारला होता.