महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांना जेलमध्येच राहावे लागणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 May :- मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात बंद असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि तळोजा कारागृहात असलेले त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या जामीन याचिकेवर आज निकाल आला नाही. न्यायालयाने त्यांच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला असून राणा दाम्पत्यांना बुधवारपर्यंत जेलमध्येच राहावे लागणार आहे. जामीनाबाबतचा निर्णय 4 मे रोजी होणार आहे.

आज सायंकाळी 5 वाजता न्यायालय निकाल देण्याची शक्यता होती पण न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत कायम आहेत. गेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबईच्या दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी सोमवारपर्यंत आदेश राखून ठेवला होता. आजही राणा दाम्पत्यांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना भडकावल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप आहे. याशिवाय एका एफआयआरमध्ये त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपही आहे. राणा दाम्पत्याच्या वतीने रिझवान मर्चंट आणि अबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला, तर मुंबईतील खार पोलिसांच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीन अर्जाला विरोध केला. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर आयपीसीच्या कलम 124-अ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.