महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या भोंगा प्रकरणावर अजित पवारांनी काढला चिमटा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 April :- सोलापूरधील अनगरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी हनुमान चालीसावरून चालेल्या गोंधळावर अजित पवार यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. तसेच पवारांनी राज ठाकरेंच्या भोंगा प्रकरणावरही चिमटा काढला. तसेच जर मशिदीवरील भोंगे काढले. तर मंदिरावरीलही भोंगे उतरतील, असे अजित पवार म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी भोंगे उतरवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर अजित पवार यांनी भाष्य केले. उत्तर प्रदेशात मशिदीवरील भोंगे हटवण्यात येत आहे. तसेच मशिदीसह मथुरेतीलही मंदिरातील लाऊडस्पिकर हटवण्यता आले आहे, असे त्यांनी सांगितले. काही विशेष नेत्यांच्या जयंती वगळता लाऊडस्पीकरला सर्वोच्च न्यायालयाने सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत परवानगी दिली आहे. पण, उद्या भोंगे हटवण्याचा निर्णय घ्यायचे झाले. तर फक्त मशिदीवरील भोंग हटणार नाहीत. तर मंदिरावरीलही भोंगे हटवावे लागतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

साईबाबाची काकड आरती सकाळी 5 ला सुरू होते. त्यावर अडचण येऊ शकते. आपल्याकडे रात्री किर्तन असतात. हरिनाम सप्ताह असतो. त्यावरही बंदी येऊ शकते, असे अजित पवार म्हणाले. राज्यात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आपण हणून पाडला पाहिजे. ज्यातून जातीय वाद वाढणार आहे. वातावरण खराब होणार आहे. त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले.

राज्यात सगळे काही ठिक असताना हनुमान चालिसावरून राजकारण सुरू केले आहे. जर कुणाला हनुमान चालिसा म्हणायचा आहे. तर त्यांनी आपल्या घरात म्हणावा. राणा दाम्पत्याला आम्हीच पुरस्कृत केले आणि ते निवडूण आले. मतदारसंघातली समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा. पण, त्यांना मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायचा आहे. त्यांना आपली घरे कमी पडत आहेत का. ज्यातून वातावरण खराब होणार आहे. ते करण्याची गरज काय, असा सवाल अजित पवार यांनी केला. तसेच जर मला आणि सुप्रियाला हनुमान चालिसा म्हणायाचा असेल तर आम्ही आमच्या घरात म्हणू, असे अजित पवार म्हणाले.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे आणि खासदार नवनीतर राणा यांच्यावर टीका केली. देशात विकासाचा, नोकरीचा मुद्दा नाही. तर देशात जातीपातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भोंग्यावरून राजकारण केले जात आहे, असे मुंडे म्हणाले.

नवनिर्माणवाले म्हणतात आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा वाचू. तर नवनीत म्हणतात, आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू. हनुमान चालिसा ही मातोश्रीसमोर आणि मशिदीसमोर नाही. तर बजरंगबलीच्या समोर वाचली जाते. हनुमाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसा वाचली जाते. कुठेही जावून जर तुम्ही हनुमान चालिसा वाचू लागले. तर कधी संकटमोचन संकट बनून तुमच्या मागे लागेल, याचा मेळ बसणार नाही, असो टोला मुंडे यांनी मनसे आणि राणा दाम्पत्याला लगावला.