महाराष्ट्र

वाचा, राज ठाकरेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 April :- औरंगाबाद येथे एक मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे औरंगाबादेत पोहचले आहेत. क्रांतीचौकात त्यांचे ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत मनसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी क्रांतिचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले आहे.

क्रांतीचौकातून राज ठाकरे निवासाची व्यवस्था असलेल्या पंचतारांकित हाॅटेलकडे गेले आहेत. त्यांच्यासोबत सुमारे 100 ते 150 वाहनांचा ताफा आहे. नगरमध्ये जोरदार स्वागत झाल्यानंतर सध्या राज ठाकरे औरंगाबादेत पोहचले आहेत. तत्पुर्वी वाळुज येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना नेवासा फाट्यालगत खडका फाटा येथे केटी संगम टोलनाक्याजवळ किरकोळ अपघात झाला. मागोमाग असलेल्या वाहनांना वाहने किरकोळ घासल्या त्यात कुणालाही इजा झाली नाही.

​​​राज ठाकरे दुपारी तीन वाजता नगरहून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. त्यांचे सायंकाळी पाच वाजेपर्यंत औरंगाबादेत आगमन होण्याची शक्यता आहे. त्यांच्या स्वागतासाठी मनसेचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जय्यत तयारी करीत आहेत. क्रांतीचौकात ढोल-ताशांचा गजर होत असून तेथेच राज ठाकरे यांचे स्वागत होणार आहे. राज ज्या पंचतारांकित हाॅटेलमध्ये असतील तेथे एकाही व्यक्तीला जाता येणार नाही तसेच चोख सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. हाॅटेलमध्ये आज राज ठाकरे मुक्काम करतील आणि त्यानंतर 1 मे रोजी सभास्थळी ते येणार आहेत. बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे हे मनसेचे नेतही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत.

औरंगाबादला निघण्यापुर्वी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. काल दुपारीच ते पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावरील आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. काल पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आज शेकडो कार्यकर्त्यांसह ते औरंगाबादला रवाना झाले आहेत.