महाराष्ट्र

सोमवारपर्यंत राणा दाम्पत्याचा मुक्काम जेलमध्ये

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 April :- अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा घरचे जेवण मिळावे म्हणून केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालायनं फेटाळून लावला आहे. राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.

मुख्यमंत्री यांचे खासगी निवासस्थान मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्यानं घेतली होती. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी नवतीन राणा यांच्यावर राजद्रोहाचा आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्यानं २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं आव्हान दिलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्यानं मातोश्रीवर जाणार नसल्याची भूमिका राणा दाम्पत्यानं घेतली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली. २४ एप्रिलला वांद्रे कोर्टानं राणा दाम्पत्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती.