दारुच्या नशेत भाच्याने केला मामीवर बलात्कार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 April :- मामीवर भाच्याने दारुच्या नशेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औसा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी औसा पोलीस (Police) ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही तासातच या आरोपीला पोलिसांनी (Police) अटक केली आहे.
पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, लातूर जिल्ह्यातील औसा शहरात मामीवर भाच्याने दारूच्या नशेत बलात्कार केला. ही महिला औसा शहरात धुणी भांड्याचे काम करते. या २८ वर्षीय विवाहितेवर तिच्याच भाच्याने दारूच्या नशेत जबरदस्ती करत बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
२८ वर्षीय पीडित महिला ही शहरात आपल्या कुटुंबासोबत राहते. काल पीडिता आपल्या घरी काम करत होती. यादरम्यान तिचा नराधम भाच्याने पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला आहे. तर याविषयी कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली होती. याप्रकरणी २८ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात नराधम आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस (Police) निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करत आहेत.