महाराष्ट्र

मा.मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोरोनामुक्त

माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

25 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचा मुंबई आणि नांदेडमध्ये प्रवास सुरू होता. राज्य सरकारच्या अनेक बैठकांना ते उपस्थित राहत होते. तसंच, त्यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्येही परिस्थितीची पाहणी करत होते. करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा चव्हाण नांदेडमध्ये होते.त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा निर्णय घेतला.