महाराष्ट्र

मनसे-भाजप युतीवर फडणवीसांचे मोठे विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 April :- राज ठाकरेंच्या गुढीपाडवा सभेनंतर मनसे – भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण चर्चेला पूर्णविराम लावला आहे. मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा झाली नाही, असा काही प्रस्ताव आलेला नाही असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी आमच्या भूमिकेशी साम्य असलेली भूमिका घेतली आहे. हिंदुत्व, आणि लाऊडस्पीकर असो या भाजपच्या भूमिका राहिल्या आहेत. मात्र मनसे आणि भाजपच्या प्रतिक्रिया अपरिपक्व आहेत. अशी कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मनसे- भाजप युतीला पूर्णविराम लगावला आहे.