अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 April :- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यांना 13 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे आता आणखी काही दिवस देशमुख यांना कोठडीतच राहावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआय कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय कोर्टाने ही मागणी फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. यावर पुन्हा झालेल्या सुनावणीत अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना ते 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागेल.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोठडीत असलेले अनिल देशमुख यांची पोलिसांच्या बदल्या संदर्भात चौकशी करायची आहे, अशी मागणी करत सीबीआयच्या वतीने त्यांचा रिमांड मागितला होता. मात्र सीबीआयने दिलेली कारणे असमाधानकारक असल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.