बीड

22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 April :- परळी तालुक्यातील मिरवट येथील शेतमजुर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेवर, दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना बुधवारी (ता.२७) दुपारी बारा वाजती घडली आहे. तालुक्यातील मिरवट गावातील २२ वर्षीय शेतमजुर पिडीत महिला ही शेतातील आखाडयावर आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.

बुधवारी (ता.२७) पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. यादरम्यान गावातील अंगद केशव भदाडे (वय ४०) व धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील उसतोड मजुर सज्जन मुकींदा तिडके (वय ३०) या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर याबाबद कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली.

याप्रकरणी विवाहीत पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात ३७६ (ड), ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक मारूती मुंडे करीत आहेत.