महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 April :- मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरूध्द मनसे आणि भाजप असा राजकीय वाद रंगला आहे. राज ठाकरेंच्या घोषणेचं लोण देशभर पसरलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने 30 एप्रिलपर्यंत बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले.

योगी सरकारच्या या कारवाईचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतूक केले आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

”उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदिंवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असे त्यांनी पत्रकात म्हटलं