भारत

देशात पुन्हा कोरोना दहशत! गेल्या 24 तासांत रुग्णांवाढीचा उच्चांक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 April :- देशात कोरोना पुन्हा एकदा दहशत माजवत आहे. बुधवारी देशात कोरोनाचे 3 हजार 303 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा 47 दिवसांतील सर्वाधिक रुग्णांवाढीचा उच्चांक आहे. यापूर्वी गेल्या महिन्याच्या 11 तारखेला 3,614 कोरोना केसेस समोर आली होती. गेल्या 24 तासांत 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 2 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 16,980 सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे, IIT मद्रासमध्ये संक्रमितांची संख्या 171 वर पोहोचली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 2,642 रुग्ण बरे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 4 कोटी 25 लाख 16 हजार 736 इतकी झाली आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.74% इतके आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 4 कोटी 30 लाख 68 हजार 799 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 5 लाख, 23 हजार, 693 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांत देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत 7,448 ने वाढ झाली आहे. 12 एप्रिल 2022 रोजी 9532 रुग्ण आढळून आली होती.

गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 1,367 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे, येथे कोरोनाचे 535 रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला. तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे, येथे 347 नवीन रुग्ण आढळले, तर 14 लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, यूपीमध्ये आणखी 258, महाराष्ट्रात 186, तामिळनाडूमध्ये 77, कर्नाटकमध्ये 126 मृत्यू आढळले आहेत.