महाराष्ट्र

संभाजी भिडे रुग्णालयात दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 April :- शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. गणपती मंदिरात जात असताना त्यांना चक्कर आली. आणि ते सायकल वरून खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संभाजी भिडे हे नेहमीच सायकलवरून प्रवास करत असतात. आजही नेहमी प्रमाणे ते सायंकाळच्या सुमारास शहरातल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी जात होते, दरम्यान काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपण चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले.

ही घटना आसपासच्या लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ धाव घेत संभाजी भिडे यांना सावरले. काही क्षणात भिडे गुरुजी उठून बसले. मात्र, या अपघातामध्ये त्यांच्या खुब्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच अनेक धारकऱ्यांना गणपती मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी केली होती. यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, भिडे यांचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत.