बीड

सोमय्यांच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 April :- किरीट सोमय्यांवर खार पोलिस स्टेशनबाहेर हल्ला झाला होता. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर दुखापत करण्यात आली होती. ही जखम नसून सोमय्यांनी टोमॅटो सॉस लावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी भाभा रुग्णालयाने सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. त्यात सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नसल्याचे, वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सोमय्यांची वैद्यकीय तपासणी नंतर हा अहवाल समोर आला आहे. सोमय्यांना गंभीर इजा नसल्याची भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यात सोमय्यांना 0.1 सेमीची जखम असल्याचे आढळून आले. सूज आणि रक्तस्त्राव नसल्याचे देखील वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. सोमय्यांनी शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे.