महाराष्ट्र

नवनीत राणाकडून संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 April :- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्या जातीच्या विरोधात वक्तव्य केले आहे असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांच्यामार्फत दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही नवनीत राणा यांनी पत्र लिहून केली आहे. राणांनी पत्रात उल्लेख केला की, संजय राऊतांनी 420 म्हणत बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी चांभार आहे, आणि संजय राऊत ओबीसी असल्याचा दाखला देत त्यांनी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध मी 2014 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, मी चांभार जातीची असल्याने माझ्या पहिल्या निवडणुकीपासून शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेना कार्यकर्ते मला धमक्या देत आहेत. माझ्या जातीबाबत खोटे आरोप करत आहेत, असे म्हणत नवनीत राणा शिवसेनेवर टीका केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून मी निवडून आले.

तेव्हापासून शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मी मागासवर्गीय आणि चांभार जातीची आहे, हे माहीत असतानाही माझ्या विरोधात वारंवार बोलले. गेल्या दोन दिवसांत त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये, समाजात माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने वारंवार माझा आणि माझ्या पतीचा उल्लेख बंटी और बबली आणि 420 असा केला आहे. यातून आमची बदनामी करण्याचा त्यांचा उद्देश आहे हे स्पष्ट होते.

मी स्त्री आहे, हे संजय राऊतांनाही माहीत होते. तरीही मी मुंबईतील खार भागातील माझ्या निवासस्थानी असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली, आणि शेकडो कार्यकर्त्यांना माझ्या घरी पाठवले, त्यांना माझ्या घराला घेराव घालण्यास भाग पाडले आणि मला बाहेर जाण्यास मज्जाव केला. तसेच खासदार संजय राऊत यांचे कार्यकर्तेही मला मारण्याची अपशब्द वापरत होते, त्यांनी माझ्यासाठी रुग्णवाहिकाही आणली होत. आणि मला मारण्याची धमकी दिली असा आरोप करत नवनीत राणा यांनी तक्रार दिली आहे.