महाराष्ट्र

कोरोना स्थितीवर आरोग्यमंत्री टोपेंचे मोठे विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 April :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्याशी आज कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले. राज्यात सध्या 25 हजार कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात सध्या कोरोनाची काळजी सारखी परिस्थिती नसल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. आवश्यकता भासल्यास गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती होऊ शकते, असेही राजेश टोपे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यात येणार आहे. राज्यात सध्या 25 हजार चाचण्या सुरू आहेत. राज्यात घाबरण्यासारखी परिस्थिती नसून नवे व्हेरियंट सुद्धा हे ओमायक्रॉनचाच भाग आहे. राज्यात कोरोना रुग्णांची चिंता करण्याची कोणतीही गरज नाही, असे राजेश टोपे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक होऊ शकतात असा निर्णय आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घेतला जाऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील. असे टोपे म्हणाले. गुढीपाडव्याला राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार मास्कबंदी देखील करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या तीन आठवड्यानंतर पुन्हा राज्यात मास्कसक्ती करण्याच्या निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर निर्बंध आणि मास्कसक्तीवर निर्णय घेतला जाणार आहे.