भारत

कोरोनाने चिंता वाढवली! मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 April :- देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरु झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्या म्हणजे बुधवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती, लसीकरणाची स्थिती, बुस्टर डोस आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्यता आहे.

देशाची राजधानी दिल्लीत कोविड बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा सर्व राज्यांमध्ये कोरोनाशी संबंधित नियम कडक करण्यात आले आहेत. मास्क घालणे अनिवार्य करण्यासोबतच तो न लावल्यास दंड आकारण्याचीही तरतूद आहे. सध्याच्या कोरोना परिस्थिती पाहिली, तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2483 नवीन रुग्ण आढळले आहेत. चीन आणि ब्रिटनसह जगातील अनेक भागांमध्ये कोरोनाची नवी लाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बूस्टर डोसवरही चर्चा होणार आहे. सर्व राज्यांना बूस्टर डोससाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास सांगितले जाऊ शकते. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आतापासूनच चाचणीवर भर दिला जात आहे. या बैठकीत पीएम मोदी राज्यांना टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटची रणनीती घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही देतील.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,483 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,30,62,569 वर पोहोचली आहे. सोमवारी कोरोना रुग्णाच्या 1399 मृत्यूची नोंद झाली होती. तर सक्रिय रुग्ण 15,636 पर्यंत वाढली आहे. तर सकारात्मकता दर 0.55% वर पोहचला आहे. दुसरीकडे, IIT मद्रासमध्ये 32 नवीन कोरोना रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्ण संख्या 111 वर पोहोचली आहे.

आज दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक 1011 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाचे 470 रुग्ण आढळले, तर एकही मृत्यू झाला नाही. तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे, येथे 290 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, यूपीमध्ये 210, मिझोराममध्ये 102, महाराष्ट्रात 84, तामिळनाडूमध्ये 55 रुग्ण आढळले आहेत.