भारत

लहान मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी

26 April :- ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 6-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. DCGI च्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 2 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लस कोवॅक्सिन देण्यासाठी भारत बायोटेककडून डेटा मागवण्यात आला होता.

सध्या 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax ही लस दिली जात आहे. यावर्षी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यांना Co-vaxin चा डोस दिला जात आहे. त्यानंतर 16 मार्चपासून या मोहिमेचा विस्तार करण्यात आला, ज्यामध्ये 12-14 वर्षांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून त्यांना कॉर्बेवॅक्स ही लस दिली जात आहे. अशाप्रकारे आता 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देशात दोन कोरोना लसी मिळत आहेत.

कोरोनाच्या गेल्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नव्हता, मात्र, कोरोनाचा नवीन विषाणू XE च्या विळख्यात मुले सापडत होती. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना प्रकरणात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, लसीला मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करू शकते ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाईल.

DCGI च्या विषय तज्ञ समितीने (SEC) नुकतीच 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर Corbevax लसीचा तात्काळ वापर करण्याची शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी या विषयावर पॅनलची बैठक झाली होती. कॉर्बेवॅक्स ही हैदराबादस्थित कंपनी बायोलॉजिकल ई द्वारे स्वदेशी विकसित केलेली RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. देशातील लहान मुलांसाठी कोरोनाची लस 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. सुरुवातीला, Covaxin फक्त 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना दिले जात होते. नंतर 16 मार्च रोजी 12 वर्षांवरील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12-14 वयोगटातील मुलांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत त्यांना 2.7 कोटी (पहिला डोस) आणि 37 लाख (दुसरा डोस) देण्यात आला आहे. त्याच वेळी, 5.82 कोटी पहिला डोस आणि 4.15 कोटी दुसरा डोस 15-18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात आला आहे.