लायकी नसताना खडसेंना भाजपमध्ये खूप पदे मिळाली
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
18 April :- ‘एकनाथ खडसे म्हणतात गिरीष महाजन यांना मी मोठे केले, मी मोठे केले पण लायकी नसताना त्यांना भाजप मध्ये खूप पदे मिळाले आहे. एकनाथ खडसे स्वतःला माशा चावून घेत असल्याने त्याचा उलट परिणाम त्यांच्यावर होत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. महाजन यांची पुण्यात आज पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी वीज प्रश्न, एकनाथ खडसेंसह विविध विषयांवर बोट ठेवले.
ते म्हणाले, एकनाथ खडसे मुक्ताईनगर नगरपालिका, ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाही. त्यांची मुलगी विधानसभेतही पडली असे असेल तर लायकी नसताना त्यांना भाजपमध्ये मोठी पदे दिली गेली तरीही ते अशी भाषा वापरत असतील तर त्यांचे संतूलन बिघडले आहे. प्रकृती आणि खूप सारे आजार त्यांना आहे. त्यामुळे त्यांची अशी मनस्थिती होणे स्वाभाविक आहे. जेल मध्ये टाका, सडवून टाका असे म्हणत असतील तर तो विक्षिप्तपणा आहे असेही महाजन म्हणाले.
स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील खंडसेंबद्दल घाण बोलतात पण मी खडसेंसोबत 25 वर्षे राहीलो मला त्यांच्याबद्दल टीका टीप्पणी करायची नाही. आपण त्यांचे अधिक संतूलन बिघडून टाकणे मला योग्य वाटत नाही असा टोलाही एकनाथ खडसे यांना गिरीष महाजन यांनी मारला.